लॉकडाऊनच्या काळात सध्या अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. त्यापैकी अभिनेत्री हेमांगी कवीसुध्दा . तीसुध्दा चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. आपल्या विनोदांनी आणि दमदार परफॉर्मन्सने हेमांगी नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. नुकतंच हेमांगीने तिचा एक सुरेख फोटो शेअर करत चाहत्यांकडून पसंतीची पावती मिळवलीय.
हेमांगीने रानातल्या पाड्यावरच्या आदिवासी तरुणीच्या वेषात खास फोटो काढले असून ते सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. तसंच विशेष म्हणजे 'रानफूल' असं खास नाव त्याला दिलं आहे. अनेकांना हा फोटो खुप भावला असून त्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा हेमांगीच्या पोस्टवर वर्षाव केला आहे. ती हुबेहूब यात स्मिता पाटील यांच्यांसारखीच दिसते. जैत रे जैत सिनेमाच्या आठवणी यामुळे ताज्या झाल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.