अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि पत्नि स्नेहाच्या आयुष्यात आली ही नवी पाहुणी

By  
on  

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांच्या आयुष्यात एक नवी पाहुणी आली आहे. याविषयीची माहिती त्यांनी नुकतीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. अनिकेत आणि स्नेहा यांनी एक फिमेल डॉग एडॉप्ट केलं आहे. इलिए असं या पेटचं नाव ठेवण्यात आलं आहे. शिवाय तिच्यासोबतचा गोंडस फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. सोशल मिडीयावर या दोघांच्या पोस्टवर यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता लवकरच या पेटचे नवे फोटो आणि व्हिडीओही दोघं पोस्ट करतील याची वाट पाहायची आहे.

 

या नव्या पाहुणीचं त्यांच्या आयुष्यात येण्याने किती आनंद आलाय हे त्यांच्या या फोटोवरून पाहायला मिळतय.

2018 मध्ये अनिकेत आणि स्नेहा या दोघांनी लग्न केलं होतं. त्याआधी दोघं 'ह्दयात समथिंग समथिंग' या सिनेमात एकत्र झळकले होते.

Recommended

Loading...
Share