सिध्दार्थ जाधव हा आपल्या मराठी कलाविश्वातला एनर्जी मॅन. त्याच्यासारखीच त्याची सहचारिणी तृप्ती जाधव आहे. तृप्तीसुध्दा सिध्दार्थसारखीच भन्नाट आहे. दोघांचाही एकमेकांना खंबीर सपोर्ट असतो आणि ते वेळोवेळी दिसूनही येतं. लॉकडाऊनच्या काळात सिध्दू आणि तृप्तीने एकमेकांसोबतचे अनेक धम्माल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
आज सिध्दार्थची बायको तृप्तीचा वाढदिवस. सिध्दार्थ-तृप्ती आणि त्यांच्या दोन गोड लेकींनी केक कापून घरातच छोटंसं सेलिब्रेशन केलं. ह्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट करत सिध्दार्थ म्हणतो, "तृप्ती, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे..हे नव्याने सांगायची गरज नाही...खुप प्रेम...बायकोचा वाढदिवस. . ..."
तसंच सिध्दार्थ पुढे पोस्ट करत म्हणतो, सिद्धू to सिद्धार्थ जाधव हा प्रवास तुझ्यामुळे आणखीन सुखकर झालाय आणि प्रवास अजूनही तुझ्या सोबतीने सुरू आहे . आणि मी हा प्रवास आत्मविश्वास करू शकतो कारण तू माझ्यासोबत आहेस ।मी अभिमानाने सांगत असतो कि माझ्या आयुष्याचा BACK BONE माझी बायको आहे...आणि ते शंभर टक्के खरं आहे...
घर, संसार, इरा, स्वरा, यांना सांभाळण्यापेक्षा ही "मला" सांभाळणं खूप कठीण आहे हे तुलाही माहितीये आणि मलाही