सध्या अनेक नानाविविध चॅलेंजेस आणि एप्सने नेटक-यांना प्रचंड भुरळ पाडलीय. एखाद्या लाटेसारखेच हे चॅलेंज येतात आणि या लाटेवर स्वार होण्यात सेलिब्रिटीसुध्दा मागे नाहीत. सर्वांचा लाडका अभिनेता शशांक केतकरलासुध्दा या एप्सची भुरळ पडली व त्यामुळे त्याला त्याची शाळेतली मैत्रिण व तिचे वडील यांची भेट घेता आली.
शशांक हा सोशल मिडीयावर बराच एक्टीव्ह असतो आणि चाहत्यांसोबत नेहमीच संपर्कात राहतो.
अहो, ही शशांकसोबत दिसणारी मुलगी आणि तिचे वडील म्हणजे शशांकच आहे, हे तुम्ही एव्हाना ओळखलं असेल. ही सारी किमया आहे फेस अॅपची. मध्यंतरी या अॅपमुळे क्रिकेटर्सचे महिला वेषातले लुक तुफान व्हायरल झाले होते.