अन्य सेलिब्रिटींप्रमाणेच आर्ची फेम सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरुसुध्दा कुटुंबियांसोबत आपला लॉकडाऊन काळ व्यतीत करतेय. रिंकू सोशल मिडीयाव बरीच सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहणं पसंत करते.
रिंकूने नुकतेच तिचे काही हटके फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.यात ती वॉकसाठी बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय. पण यासोबतचं तिने एक खास सल्लासुध्दा या फोटोंसोबत दिला आहे, तो म्हणजे " एकटेच बसा आणि स्वत:ची सोबत एन्जॉय करा. आजूबाजूच्या खोटे मुखवटे चढवलेल्या लोकांपेक्षा हे बरं नाही का..."
रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
नेहमीच बिझी शेड्यूलमधून घरापासून दूर असलेले सेलिब्रिटीसुध्दा घरकामात दंग असलेले या क्वारंन्टाईन काळात सोशल मिडीयाद्वारे पाहाायला मिळाले.