अभिनेता अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री, पाहा फोटो

By  
on  

लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्यात आपल्या कामाची खास छाप उमटवणारा कलाकार म्हणजे अद्वैत दादरकर. सौमित्र या भूमिकेतून त्याने रसिकांच्या मनात घर केलं आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवणा-या सौमित्र फेम अद्वैतची पत्नीसुध्दा अभिनेत्री आहे. भक्ती देसाई असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. 

अभिनेत्री भक्ती देसाई ही संकर्षण क-हाडे याच्यासोबत अलिकडेच  ‘तु म्हणशील तसं’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ह्या नाटकाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद  दिला. 

 

 

झी मराठीवरील अरुंधती  या मालिकेत भक्ती देसाई नायिका म्हणून झळकली होती.

 

तर अंजली या झी युवावरील डॉक्टरांभोवती कथानक गुंफण्यात आलेल्या मालिकेतसुध्दा भक्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली. 

 

भक्ती आणि  अव्दैत एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचं लग्नात झालं.

 

 

या दोघांना मीरा नावाची चार वर्षांची गोंडस चिमुकली आहे. अलिकडेच हे कुटुंब अळी मिळी गुप चिळी या कार्यक्रमात झळकलं होतं. 

Recommended

Loading...
Share