अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी देशपांडे यांचा 2017मध्ये विवाह सोहळा पार पडला होता. आणि त्यांच्या याच लग्नसोहळ्याला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. अमेय आणि साजिरी हे दोघं याआधी 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
याच लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमेय वाघने त्याच्या हटके स्टाईलमध्ये पत्निला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसाठी लिहीलेलं कॅप्शन इंटरेस्टिंग आहे. तो लिहीतो की, "आज मला साजिरी ह्यांच्या पर्सनल ड्रायव्हरची नोकरी मिळून ३ वर्ष झाली ! आता आयुष्यभरासाठी मी ड्रायव्हिंग क्रेझी, माझ्या नोकरीप्रदान सोहळ्यातील हे काही क्षण! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मालकिण !" असं म्हणत त्याने पत्निला शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मिडीयावर अमेय आणि साजिरीच्या लग्नाचा हा व्हिडीओ सगळ्यांना प्रचंड आवडला आहे. शिवाय मनोरंजन विश्वातील अमेयच्या मित्र-मंडळींनीही या व्हिडीओली पसंती दिली असून त्यांनी व्हिडीओवर प्रतिक्रियाही लिहील्या आहेत.