By  
on  

घरात दुर्गाचं पेंटिंग येताच भावुक झाली अमृता खानविलकर

  अभिनेत्री अमृता खानविलकरला पेटिंगची प्रचंड आवड आहे. आर्टिस्ट विजयालक्ष्मी यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी अमृताला चक्क दुर्गा मातेची पेंटिंग दिली. ही पेंटिंग अमृताला प्रचंड आवडली आहे. तिने सोशल मिडीयावरही याविषयी पोस्ट केली होती. या पेंटिंगचं स्वागत अमृताने आनंदाश्रूने केलं आहे. 

नुकतच विजयालक्ष्मी यांनी अमृताचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ही पेंटिंग पाहिल्यानतरची अमृताची प्रतिक्रिया पाहायला मिळतेय. ही पेंटिंग पाहताच क्षणी अमृता निशब्द झाली आहे. शिवाय ती भावुकही झाली असल्याचं या व्हिडीओत आहे. ही पेटिंग घरी येताच अमृताच्या घरी प्रसन्न वातावरण निर्माण झालय. अमृताची पेंटिंग पाहिल्यानंतरची ही प्रतिक्रिया पाहून  आर्टिस्ट विजयालक्ष्मी यांनाही आनंद झाला आहे. दुर्गाष्टमीच्या दिवशी अमृताच्या घरी ही सुंदर पेंटिंग आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive