अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मस्त महाराष्ट्र या ट्रॅव्हल शोमध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामध्ये ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील संस्कृती आणि त्याची विविध माहिती महाराष्ट्रभर फिरून प्रेक्षकांना देणार आहे. या कार्यक्रमाचं चित्रीकरण लॉकडाउनच्या आधीच पूर्ण झालं आहे. मात्र आता प्राजक्या डबिंगच्या कामाला रुजू झाली आहे. नुकतीच प्राजक्ताने या कार्यक्रमाच्या डबिंगला सुरुवात केली आहे.
नुकताच तिने तिच्या डबिंग सेशनचा फोटो पोस्ट केला आहे. तिचा हा कार्यक्रम दोन वाहिन्यांवर दिसणार आहे. यासाठी ती मराठीतील सुत्रसंचालन हे हिंदीत आणि हिंदीतील मराठीत अशा दोन भाषांमध्ये डबिंग करत आहे. यादरम्यान या कार्यक्रमाचा दिग्दर्शक गोपीकृष्णन तिला कशा पद्धतिने मदत करतोय याविषयी ती या पोस्टमध्ये सांगते. ती लिहीते की, "डबिंग सेशन, तुम्हाला माहित आहे का की मी लिव्हींग फूड्जच्या टेलेकास्टसाठीही डबिंग करत आहे. (shooting वेळी जे मराठीत बोललेय ते LF साठी हिंदीत dub करतेय आणि जे हिंदीत बोललेय ते झी मराठी साठी मराठीत. होय डबल काम. पण माझा जुना मित्र आणि शोचा दिग्दर्शक गोपीकृष्णन नायरने हे इंटरेस्टिंग आणि सोपं करुन दिलय. माझ्या मल्लू मित्रा मला फ्रिडम मिळालं तर मी तूला माझा पर्सनल डायरेक्टर म्हणून अपॉइंट करेल."
येत्या 3 जुलैपासून प्राजक्ताचा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या ट्रॅव्हल शोच्या निमित्ताने प्राजक्ता महाराष्ट्रभर फिरली आहे आणि तेथील माहिती जाणून घेतली आहे. तिचासाठी हा प्रवास अविस्मरणीय ठरला असेल एवढं नक्की.