सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७२ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. सरोज खान यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेसुध्दा एक जुना सेटवर फोटो पोस्ट करत मास्टरजींना श्रध्दांजली वाहिली आहे.
उर्मिला म्हणते, सरोजजींच्या निधनाची बातमी ऐकून खुप वाईट वाटलं. त्यांच्या नृत्यातलं प्रत्येक कांगोरे त्यांना माहित असतात. त्याचं प्रत्येक गाणं म्हणजे मास्टरपीसच.