"तुमची गाणी पाहून मी डान्स शिकले होते", फुलवा खामकरने सरोजजींना वाहिली श्रध्दांजली

By  
on  

प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हिंदी सिनेसृष्टीसह मराठी सिनेसृष्टीही हळहळली आहे. मराठीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरनेही सरोजजींना श्रध्दांजील वाहिली आहे. सरोज खान यांच्यासोबतच्या आठवणीतला फोटो फुलवाने पोस्ट केला आहे. 

या पोस्टमध्ये फुलवा लिहीते की, "होय, हे मोठं नुकसान आहे, मी त्यांनी कोरिओग्राफ केलेली गाणी पाहत मोठी झाली आहे. तुम्ही नेहमीच माझ्या आयडल होत्या. ग्रेस, हावभाव, स्टेप्स या सगळ्या गोष्टी मी तुम्ही कोरिओग्राफ केलेल्या गाणी पाहून शिकले. तुमच्या आत्म्यास शांती लाभो." 

 

फुलवा सारख्या कित्येक नृत्यदिग्दर्शकांसाठी सरोज खान या प्रेरणा स्थान होत्या. विशेषकरून महिला नृत्यदिग्दर्शिकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळायची.

Recommended

Loading...
Share