या मराठी सिनेमातील गाण्यासाठी सरोज खान यांनी केली होती कोरिओग्राफी

By  
on  

मास्टरजी सरोज खान यांच्या निधनांतर मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्यासोबतच्या आठवणी, त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. अभिनेत्री दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनीही सरोज खान यांची एक खास आठवण शेयर केली आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' या सिनेमातील एका गाण्यासाठी सरोज खान यांनी कोरिओग्राफी केली होती. या गाण्याची खास आठवण आणि फोटो मृणाल कुलकर्णी यांनी शेयर केला आहे. 

मृणाल कुलकर्णी या पोस्टमध्ये लिहीतात की, "हे गाणं जे सरोजजींनी दिग्दर्शित केलं होतं रमा माधव या मी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात. आदिती राव हैदरीवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. प्रेमळ आठवणी."

 

'रमा माधव' या सिनेमातील 'लुट लियो मोहे श्याम' या गाण्यासाठी सरोज खान यांनी कोरिओग्राफी केली होती. 

Recommended

Loading...
Share