Video सागर कारंडेच्या घरी सुरु आहे हा खास पदार्थ, हे आहे निमित्त

By  
on  

बळीराजाच्या कष्टांसोबतच शेतात अहोरात्र राबणा-या कष्टकरी बैलांचा वर्षातून एकदा बैलपोळा सण साजरा करतात. या दिवशी बैलांना न्हाऊ घालून त्यांना सजवलं जातं. त्यांची पूजा केली जाते आणि गोडधोड खाऊ घातलं जातं, म्हणजेच खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.

म्हणूनच विनोदवीर अभिनेता सागर कारंडे याच्या घरी आज पुरणपोळीचा बेत आहे. त्याससोबतच सागरच्या लग्नाचासुध्दा वाढदिवस असल्याने हा दुहेरी योग जुळून आला आहे. सागर आणि त्याची बायको मिळून पुरण वाटतायत.

सागर म्हणतोय, कधी काय आहे तेच कळत नाहीये ...उद्या नक्की काय आहे ?..काहीही असो...जीथे असाल...तीथे आनंदी राहा...

Recommended

Loading...
Share