पाहा Video : अमृता देशमुखचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल हसून हसून लोटपोट

By  
on  

अभिनेत्री अमृता देशमुख ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. मालिका आणि सिनेमांमध्ये झळकणारी अमृता तिच्या सोशल मिडीयावरही काहीना काही मजेशीर व्हिडीओ बनवून पोस्ट करत असते. काही महिन्यांपूर्वी अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटपासून ब्रेक घेतला होता. मात्र आता ती पुन्हा इन्स्टाग्रामवर परतली आहे. 

नुकताच अमृताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती पायाला लागण्याची एक्शन ही हिंदी गाण्यांवर करते. विविध हिंदी सिंगरच्या गाण्यावर ती ही एक्शन करताना दिसतय. हा व्हिडीओ पाहणं मजेशीर ठरतय. ती या व्हिडीओच्या पोस्टमध्ये लिहीते की, "आता दर्द हिंदीतून होणार...तुम्ही सांगा कोणते सिंगर आहात तुम्ही ?"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आता दर्द हिंदीतून होणार... Now which singer are you?

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta) on

 

सोशल मिडीयावर नेटकऱ्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. त्यांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
 

Recommended

Loading...
Share