अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आयुष्यात सध्या बऱ्याच खास गोष्टी सुरु आहेत. म्हणूनच ती म्हणते की तिची पाचही बोटं तूपात आहेत नंतर म्हणते की "नाही नाही पुंगळ्यात आहेत". याचं कारणं असं की तिच्या आयुष्यात पाच खास गोष्टी नुकत्याच घडल्यात. त्याची यादी तिने सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून चित्रीकरण बंद आहेत. त्यामुळे प्राजक्ता होस्ट करत असलेला कार्यक्रम हास्यजत्राचे चित्रीकरणही बंद होते. मात्र लॉकडाउनच्या आधी चित्रीत केलेल्या एका ट्रॅव्हल शोचे अपडेट लॉकडाउनच्या काळात ती देत होती. मात्र त्याचही डबिंग बाकी होतं. शिवाय ती लॉकडाउनच्या काळात मुंबई पासून दूर होती. मात्र नुकतच या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या पाच खास गोष्टींची यादी प्राजक्ताने सांगीतली आहे.
तर प्राजक्ताचा हा ट्रॅ्व्हल शो एका वाहिनीवर हिंदीत तर दुसऱ्या वाहिनीवर मराठी दिसत आहे. नुकतच मस्त महाराष्ट्र या तिच्या हिंदी कार्यक्रमाला लिव्हींग फूड्ज वाहिनीवर टेलेकास्टला सुरुवात झाली आहे. शिवार दर रविवारी हाच कार्यक्रम मराठीतून झी मराठी वाहिनीवर दाखवला जात आहे. तर तिसरी गोष्टी अशी की इन्स्टाग्रामवर आता प्राजक्ताचे तब्बल 1.2 मिलीयन फॉलोवर्स झाले आहेत. तिसरी खास गोष्ट अशी की हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्राजक्ताने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करून सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. पाचवी खास गोष्ट अशी घडली की प्राजक्ता तिच्या मुंबईच्या प्रिय घरात राहायला आली आहे. आणि मुंबईचा पावसाळा सुरु झाल्याने तिला तिथे पावसाचा आनंद लुटता येणार आहे. या पाचव्या खास गोष्टीविषयी ती लिहीते की, " आणि finally मी माझ्या मुंबईच्या प्रिय घरात रहायला आले आणि माझा प्रिय पावसाळा सुरू झालाय
(हे सगळ्यात जास्त महत्वाचं- अर्थात आयतं जेवणाचं ताट आणि याज्ञाला जाम miss करणार)"
तेव्हा प्राजक्ता तिच्या पाच खास गोष्टींमुळे प्रचंड आनंदी आहे. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळातही प्राजक्ता अशीच आनंदी राहून सोशल मिडीयावरही सकारात्मक दिसली.