अमृता खानविलकर आणि रणवीर सिंहची मैत्री जगजाहीर आहे. अनेकदा या दोघांचे धम्माल फोटो सोशल मिडीयावरुन पाहायला मिळतात. आज तर या बॉलिवूडच्या एनर्जी मॅनचा वाढदिवस. मग अमृता त्याला खास स्टाईलने शुभेच्छा तर देणारच...तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर दोघांचे काही खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
रणवीरला शुभेच्छा देता अमृता म्हणते, "सर्वौत्तम माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा... जो मला ओळखतो, माझ्यावर भरभरुन प्रेम करतो...रणवीर तुला खुप सारं प्रेम...आणखी मोठा हो...तुला सर्व उत्तमच मिळो... तुझ्यासारखं दुसरं कुणीच होऊ शकत नाही. "
मध्यंतरी एकदा अमृता ज्या स्टुडिओत शुटींग करत होती, त्या स्टुडिओशेजारी रणवीर सिंह काही कामानिमित्त पोहचला होता. त्याला जेव्हा कळलं की, अमृता खानविलकर बाजूलाच शूटींग करतेय, तेव्हा त्याने आवर्जुन अमृता खानविलकरची भेट घेतली होती.
मराठी सिनेसृष्टीतली बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर व बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहच्या या मैत्रीचं सर्वांनाच अप्रूप वाटतं.