अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकचा उत्साह नेहमीच वाखाणण्याजोगा असतो. मग कधी घरीच नानाविविध पदार्थ तयार करणं असो किंवा मग एखाद्या सण-उत्सवाची जय्यत तयारी करणं असो. मंजिरी ओक नेहमीच यात परंपरा, वैविध्य आणि आधुनिकतेचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करते. नुकतीच गुरुपोर्णिमा साजरी झाली आहे यानिमित्त तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन काहीतरी खास चाहत्यांना पाहायला मिळालं.
ही खास गोष्ट म्हणजे, मंजिरी चक्क माधुरी दीक्षितच्या चने कें खेत में... या गाण्यावर थिरकल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळालं. तसं तर हा व्हिडीओ ती पोस्ट करणार नव्हतीच. पण त्याचं झालं असं, तिच्या डान्सगुरुंनी त्यांच्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ अपलोड केल्याने मंजिरीला हा व्हिडीओ शेअर करावाच लागला.
अर्थातच या व्हिडीओचं शूटींग दस्तरखुद्द प्रसाद ओक यांनीच केलं आहे. प्रसाद ओकप्रमाणेच मंजिरीचासुध्दा एक स्वतंत्र चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अक्षरश: कॉमेंट्स आणि लाईक्समधून तिला भरभरुन दाद दिली आहे.
या व्हिडीओवरुनच मंजिरी ओक किती हौशी आहे , हे दिसून येतं.