लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वातली कलाकार घरातच आहेत तर काही कलाकार चित्रीकरण सुरु झाल्याने सेटवर रुजू झाले आहेत. मात्र लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळापासून जे कलाकार घरात होते त्यांनी निवांत न बसता सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम केले. यापैकीच एक आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंता म्हणून प्रसिध्द असलेल्या अपूर्वाने तिचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरु केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती विविध मजेशीर भूमिका साकारत आहे. या निमित्ताने विविध भूमिका साकारण्याची तिची हौसही पूर्ण होत असल्याचं पाहायला मिळतय. आत्तापर्यंत तिने विविध रंजक भूमिका साकारल्या. आणि आता चक्क ती बनली आहे लहान मुलगी. बडबडी जाई असं या भूमिकेचं नाव आहे. या भूमिकेतील नवा भागही प्रदर्शित करण्यात आला आहे.
अपूर्वाच्या या नव्या प्रयोगाला चाहत्यांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहेत.