2022 मध्ये प्रदर्शित होणार समुद्रातील गनिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांच्यावर आधारित सिनेमा 

By  
on  

भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांचा समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता, ज्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे.  क्रीएटीव्ह मदारीस प्रस्तुत राहुल जनार्दन जाधव यांच्या ’कान्होजी आंग्रे’ या सिनेमाच्या प्रदर्शनाविषयीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या चित्रपटाचे लेखन डॉक्टर सुधीर निकम यांनी केले असून चित्रपटाचे पर्यवेक्षक निर्माते राहुल भोसले आहेत.

 

कान्होजी आंग्रे यांची शौर्य गाथा ही प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचावी या उद्देशाने 2022 मध्ये या चित्रपटाची टीम हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. सिनेमाचां काम पूर्ण करण्यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने सिनेमाच्या टीमने हा सिनेमा 2022 या वर्षी आणण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा या सिनेमासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. या सिनेमाविषयीची आणखी माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

Recommended

Loading...
Share