अभिनयात मग्न व्हा, लोकांची मने जिंकून घ्या - हार्दिक जोशी

By  
on  

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला इतकी वर्षी झालेली असतानाही प्रेक्षक या मालिकेला अजूनही प्रेम देत आहेत. प्रेक्षकांनी या मालिकेला आणि मालिकेच्या कलाकारांना पसंतीची पावती दिली. एवढच नाही तर या मालिकेतील कलाकारांच्या भूमिकांच्या नावाने ते जास्त प्रेक्षकांच्या परिचयाचे झाले आहेत.

अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेत राणादाच्या भूमिकेत आहे. राणादाचा स्वभाव, त्याचं वागणं बोलणं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना राणादा आवडतो. नुकतीच लॉकडाउनमुळे मोठ्या कालावधीनंतर या मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यातच कलाकारही मालिकेच्या सेटवर पुन्हा काम सुरु झाल्याने आनंदी आहेत. याविषयी एक पोस्ट हार्दिक जोशीने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जेव्हा लोक आपल्याला आपल्या वास्तविक नावाने नव्हे तर टीव्हीवर पाहत असलेल्या एखाद्या भुमिकेच्या नावाने ओळखतात तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात यश मिळते अभिनयात मग्न व्हा, लोकांची मने जिंकून घ्या. . . . . . . #zeemarathiofficial #marathimedia #hardeekjoshi #tujhyatjeevrangala #loveforfans #lockdownlife #shooting #onset #ranastyle #ranada #chaltayki

A post shared by Hѧяԁєєҡ jȏṡһı (@hardeek_joshi) on

 

त्याला त्याच्या भूमिकेच्या नावाने मिळणारी ओळख ही जबाबदारीची वाटते. आणि हेच त्याचं यश असल्याचं तो म्हणतो. हार्दिक जोशी लिहीतो की, "जेव्हा लोक आपल्याला आपल्या वास्तविक नावाने नव्हे तर टीव्हीवर पाहत असलेल्या एखाद्या भुमिकेच्या नावाने ओळखतात तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात यश मिळते अभिनयात मग्न व्हा, लोकांची मने जिंकून घ्या." यासोबतच हार्दिकने त्याचा सेटवरील फोटोही पोस्ट केला आहे.

लवकरच या मालिकेचे नवे भाग येत्या 13 जुलैपासून प्रसारित होत आहेत.

Recommended

Loading...
Share