आज फिटनेसला खुपच जास्त महत्त्व आहे. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असं सर्वत्र म्हटलं जातं. त्याप्रमाणे आज प्रत्येकजण स्वत:ला फिट ठेवण्यासाठी धडपडतोय. धकाधकीचे आयुष्य, वेगाने बदलत्या जीवनशैलीमध्येही सक्षम आरोग्य जपण्यासाठी नेमके काय करावे याची गुरुकिल्ली प्रसिध्द एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज चाहत्यांना सांगतायत.
बिग बॉस मराठीमध्ये इतर तरुण कलाकारांसोबत प्रकर्षाने जाणवत होता तो किशोरीताईंचा उत्साह.प्रत्येक कामात त्या हिरहिरीने भाग घ्यायच्या. आजही अभिनयासोबतच डान्स व इतर उप्रक्रमांमधला त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. योग्य आहार व नियमित व्यायाम ही त्यांच्या आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचं त्या सांगतायत. तसंच किशोरीताई पुढे हेसुध्दा नमूद करतात की, स्ट्रेसफ्री आयुष्याचा फिटनेसमध्ये महत्त्वाचा वाटा असतो.
एकूणच काय आजच्या काळात सर्वांनी फिट राहायलाच हवं... मग ते सेलिब्रिटी असोत किंवा सामान्य. आरोग्यम धनसंपदा....