येसूबाई म्हणून महाराष्ट्राच्या घरांघरांत प्रसिध्द झालेली स्वराज्यरक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच सोशल मिडीयावर एक्टिव्ह असते. नानविविध पोस्टमधून ती चाहत्यांशी संवाद साधते. नुकतीच तिने सोशल मिडीयावरुन चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे प्राजक्ता प्रेमात पडली आहे. याचीच कबुली खुद्द तिनेच दिली आहे. काय, चकीत झालात ना...भुवया उंचावल्या ना....हो बातमी खरी आहे !
अहो, प्राजक्ता प्रेमात पडलीय ती तिच्या पेट डॉग मर्सीच्या प्रेमात...त्याची कबुली खुद्द तिनेच सोशल मिडीयावरुन दिली. झालात ना...चकित . तुमचाही जीव भांड्यात पडला असेल. पण प्राजक्ताला प्राण्यांची खुप आवड आहे, हे वेळोवेळी दिसून आलं आहे.
मर्सीला आंजरताना-गोंजरताना त्याचे लाड करताना प्राजक्ता खुपच क्यूट दिसतेय. चाहत्यांनी प्राजक्ता आणि मर्सीच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.