By  
on  

अभिनेत्री जुई गडकरीने केली या गोष्टीची घोषणा वाढदिवसाला अशी केली नवी सुरुवात

अभिनेत्री जुई गडकरीचा आज वाढदिवस असल्याने सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र याच वाढदिवसाला काही खास करण्याचं जुईने ठरवलं होतं. याचीच घोषणा तिने आज केली आहे. 

जुईने नुकतच तिचं यूट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून विविध व्हिडीओ ती पोस्ट करणार आहे. यात पहिलाच व्हिडीओ तिने बनवलेला बर्थडे चोकोलेट केकची रेसीपीचा आहे. वाढदिवसाचं निमित्त साधून तिने तिच्या चाहत्यांना हे सरप्राईज दिलं आहे. शिवाय आज इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन तिने चाहत्यांसोबत संवाद साधून याविषयीची घोषणा केली.

'द स्मॉल टाउन गर्ल' असं या चॅनेलचं नाव जुईने दिलं आहे.

'पुढचं पाऊल' या मालिकेतून जुई प्रेक्षकांची आवडती बनली. त्यानंतरही तिने अनेक मालिका केल्या. शिवाय बिग बॉस मराठी कार्यक्रमाच्या पहिल्याच पर्वात जुई स्पर्धक म्हणून होती. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive