कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउन या सगळ्यात मनोरंजन विश्वाचं कामही बंद झालं. सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने टेलिव्हीजनवर मात्र मालिकांचे जुने भाग आणि जुन्या मालिका पाहायला मिळत होत्या. मात्र ही परिस्थिती आता बदलणार आहे. कारण नुकतच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मालिकांचे नवे भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
इतर काही वाहिनींप्रमाणे झी मराठी वाहिनीच्या सगळ्या मालिका आणि त्यांचे नवे भाग येत्या 13 जुलैपासून प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मात्र हा दिवस मराठी मनोरंजनाचा सण म्हणून साजरा करण्याचं आवाहन अभिनेता वैभव मांगले करत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ या वाहिनीच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. यात लिहीलय की, ""अंधःकाराकडून तेजाकडे वाटचाल करूया. मराठी मनोरंजनाचा हा सण उत्साहात साजरा करूया" वैभव मांगलेही करताहेत आवाहन. १३ जुलैला झी मराठी मनोरंजनाचं स्वागत करण्यासाठी आपापल्या घरी रांगोळ्या काढून, तोरणं सजवून, गोडाधोडाचं करून सज्ज व्हा आणि जिंका खास भेट."
तेव्हा हा मनोरंजनाचा सण साजरा करण्यासाठी रांगोळ्या काढून, तोरणं सजवून, गोडाधोडाचं करून सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.