By  
on  

पाहा Photo : साधू बाबांच्या वेषातल्या या मराठी अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

कपाळावर भस्म, गळ्यात माळा आणि साधू बाबांसारखा वेष केलेल्या या अभिनेत्याला ओळखलंत का......हा  आहे मराठीतला हॅण्डसम हंक अभिनेता ज्याच्यावर तरुणी होतात फिदा...सिक्स पॅकवाला हा अभिनेता मराठी सिनेमांमधून  शानदार  झळकतो. इतकंच नाही तर ऐतिहासिक सिनेमांसाठी तो जास्त ओळखला जातो. फर्जंदमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर हा अभिनेता लवकरच जंगजौहर या आगामी सिनेमाधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

अहो, बरोबर ओळखलंत...हा  अभिनेता आहे अंकित मोहन..लॉकडाऊनपूर्वीच प्रदर्शित झालेलया मन फकीरा या तरुणाईच्या नात्यांचा गुंता सोडवणा-या सिनेमातून त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 

जगत जननी मॉं वैष्णौ देवी या हिंदी मालिकेत अंकित भैरवनाथांची व्यक्तिरेखा साकारतोय. ॐ हर हर महादेव ...म्हणत मी ही व्यक्तिरेखा साकारण्यास खुप उत्साही असल्याचं अंकितने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन चाहत्यांना सांगितलं आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive