सरंजामेंसाठी मायरा बनली रॅपर, तिच्या रॅप सॉन्गचा व्हिडिओ पाहिलात का?

By  
on  

अनेक कलाकार अभिनयाव्यतिरिक्तही अनेक कला अंगी बाळगून असतात. काही विशेष प्रसंगात त्यांच्यातील कलेचं आपल्याला दर्शन घडत असतं. असाच गुण तुला पाहते रे मधील मायरा कारखानीस म्हणेज अभिज्ञा भावे हिच्यामध्ये देखील आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अभिज्ञा उत्तम ड्रेस डिझायनर देखील आहे. तिचा क्लोदिंग ब्रॅण्ड पण आहे. याशिवाय अभिज्ञा एक उत्तम रॅपर पण आहे.

तिने अलीकडेच तुला पाहतेच्या सेटवर एक रॅप सॉन्ग बनवलं आणि टीमसोबत ते गायलंही. या सॉन्ग्मध्ये विक्रांत, इशा, मायरा झेंडे, इशाची आई, बिपीन, रुपाली या सगळ्यांचा उल्लेखही आहे.

या गाण्यातील व्हिडिओमध्ये विक्रांत, मायरा, इशा, जयदीप, सोनिया वहिनी, झेंडे या सगळ्यांनीही ताल धरला आहे. या व्हिडिओवर रसिकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तुम्हीही या व्हिडिओचा आनंद घ्या.

https://www.instagram.com/p/BsudAIyhLMj/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

Loading...
Share