गोदाक्काला सनीदा ने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, या आठवणींना दिला उजाळा

By  
on  

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या नव्या भागांच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. त्यातच या मालिकेतील सनी दा साकारणाऱ्या राज हंचनाळे याने सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून या मालिकेची आठवण पाहायला मिळतेय. 

या मालिकेत गोदाक्का साकारणाऱ्या अभिनेत्री छाया सांगवकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सनी दा म्हणजेच राजने सेटवरील काही आठवणींना उजाळा दिला आहे. गोदाक्कासोबतच्या खास आठवणी या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत.  या फोटोंमध्ये राणादा, पाठकबाई देखील पाहायला मिळत आहेत.

लॉकडाउनमुळे या मालिकेचं चित्रीकरण जवळपास तीन महिने बंद होतं. नुकतीच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. येत्या 13 जुलैपासून या मालिकेचे नवे भाग पाहायला मिळतील.

 

Recommended

Loading...
Share