पाहा Video : अभिनेत्री अश्विनी भावे यांचा असा फसला बेकरीच्या पावाचा प्रयोग, शेयर केला मजेशीर व्हिडीओ

By  
on  

अभिनेत्री अश्विनी भावे हे लग्न झाल्यापासून अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. तिथे त्या कधी त्यांच्या बागेत विविध फुलं झाडं उगवतात तर कधी स्वयंपाक घऱात छान भारतीय पदार्थ बनवताना दिसतात. याविषयीचे व्हिडीओ त्या त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करतात. 

नुकताच अश्विनी भावे यांनी बेकरीसारखा पाव घरात बनवण्याची रेसिपी करून पाहिली आहे. आत्तापर्यंत न केलेल्या रेसिपी करून पाहण्याचं त्यांनी ठरवलं आहे. सध्या अमेरिकेत त्या बेकरीचा गरमा गरम पाव मिस करत आहेत. मात्र त्यांची ही रेसिपी फसली. मात्र डिग्रीचा गोंधळ झाल्याने पाव काही झाला नाही. फॅरनहाइट आणि सेल्सियसचा हा गोंधळ होता. यासाठी त्यांनी एक गमतीशीर कॅप्शनही लिहीलय. त्या लिहीतात की, "भारतीय पाव बनवताना, ड्रिग्री महत्त्वाची नसते, मात्र जर भारतीय पाव तुम्ही युएसए मध्ये बनवता तेव्हा डिग्री महत्त्वाची असते." 

 

  पुन्हा त्यांनी प्रयत्न करुन पाहिला त्यानंतर पाव मात्र तयार झाला. हा पाव पाहून त्यांना त्यांच्या लहापणीचा किस्सा आठवला. तोही त्यांनी शेयर केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटरव पोस्ट केला आहे.

Recommended

Loading...
Share