वैभव तत्ववादीचा आजीला व्हिडीओ कॉल, आजीसोबत अशा केल्या मजेशीर गप्पा

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत सध्या लॉकडाउन अजूनही सुरुच आहे. या परिस्थितीत घरात बसून आपल्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबाला मिस करणाऱ्या मंडळी व्हिडीओ कॉल द्वारे संपर्क साधत आहेत. आणि असाच एक खास व्हिडीओ कॉल केला आहे अभिनेता वैभव तत्तवादीने. 

वैभव तत्ववादीने त्याच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आहे त्याच्या आजीसोबतच्या व्हिडीओ कॉलचा. वैभवने नुकत्यात त्याच्या आजीला व्हिडीओ कॉल केला होता. आणि या व्हिडीओ कॉलमध्ये त्याच्या आजीसोबत धमाल गप्पा रंगल्या. या व्हिडीओ कॉलमध्ये आजी आणि वैभव मनसोक्त हसताना दिसत आहे. 

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वैभव लिहीतो की, "आजी परत आली, पण यावेळी व्हिडीओ कॉलवर." 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This time, on a video call️

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

त्याच्या या कॅप्शनचं कारण म्हणजे याआधी वैभवने त्याच्या आजीसोबतचा एक मेजशीर व्हिडीओ शेयर केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aji doesn’t like me wearing torn jeans #Fashionpolicing #hahaha #vtofficial

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

 

Recommended

Loading...
Share