By  
on  

हा आहे अभिनेता सिध्दार्थच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण, आठवण केली शेयर

प्रसिध्द अभिनेता निळू फुले यांच्यासोबत काम करण्याची संधी कोणताही कलाकार कसा सोडेल. असच झालं होतं अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या बाबतीत. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिनवादन करत अभिनेता सिध्दार्थ जाधवने एक खास आठवण शेयर केली आहे. 'गाव तसं चांगलं' या सिनेमाच्या निमित्ताने सिध्दार्थ जाधवने त्यांच्यासोबत फ्रेम शेयर केली होती. 

या सिनेमातील काही फोटो शेयर करून सिध्दार्थने निळू फुले यांच्या या आठवणींना उजाळा दिला आहे. तो लिहीतो की, "एक कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात असे खूप काही अविस्मरणीय क्षण आहेत जे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. त्यातलाच एक हा "स्वर्गीय निळूफुले" सरांबरोबर काम करण्याचा योग . "गाव तसं चांगलं" या सिनेमाच्या निमित्ताने मला निळूभाऊं बरोबर काम करायची संधी मिळाली .या सिनेमाचे दिग्दर्शक महेश टिळेकर सरांना मी विनंती केली होती संपूर्ण सिनेमात निळूभाऊ आहेतच..पण किमान एक तरी सीन माझा निळूभाऊंबरोबर असावा .लहान असताना ज्यांची कामे फक्त पडद्यावर टीवीवर पाहिलीयत अशा एवढ्या मोठ्या, दिग्गज,जेष्ठ ,श्रेष्ठ कलाकाराबरोबर "सिनेमातली frame" share करायला मिळत असेल तर माझा सारखा कलाकार ती संधी का सोडेल. हाच तो सीन . या सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तो निळूभाऊंच्या सहवासातच घालवला. त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या... आणि नकळतपणे त्यांनी बराचश्या गोष्टी आम्हाला शिकवल्याही ....निळूभाऊ बरोबर काम करायला मिळणं ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी achievement आहे. आज निळूभाऊंचा स्मृतिदिन... विनम्र अभिवादन"

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एक कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात असे खूप काही अविस्मरणीय क्षण आहेत जे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. त्यातलाच एक हा "स्वर्गीय निळूफुले" सरांबरोबर काम करण्याचा योग . "गाव तसं चांगलं" या सिनेमाच्या निमित्ताने मला निळूभाऊं बरोबर काम करायची संधी मिळाली .या सिनेमाचे दिग्दर्शक महेश टिळेकर सरांना मी विनंती केली होती संपूर्ण सिनेमात निळूभाऊ आहेतच..पण किमान एक तरी सीन माझा निळूभाऊंबरोबर असावा .लहान असताना ज्यांची कामे फक्त पडद्यावर टीवीवर पाहिलीयत अशा एवढ्या मोठ्या, दिग्गज,जेष्ठ ,श्रेष्ठ कलाकाराबरोबर "सिनेमातली frame" share करायला मिळत असेल तर माझा सारखा कलाकार ती संधी का सोडेल. हाच तो सीन . या सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तो निळूभाऊंच्या सहवासातच घालवला. त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या... आणि नकळतपणे त्यांनी बराचश्या गोष्टी आम्हाला शिकवल्याही .... निळूभाऊ बरोबर काम करायला मिळणं ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी achievement आहे. आज निळूभाऊंचा स्मृतिदिन... विनम्र अभिवादन #missyou #Nilubhau #निळूफुले

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

तेव्हा निळू फुले यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचं समाधान सिध्दार्थला आहे. त्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी हाही एक क्षण असल्याचं तो सांगतो.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive