प्रसिध्द नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

By  
on  

प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचं आज सकाळी ब्रेन हॅमरेजच्या आजाराने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

'मदर्स डे', 'वनरुम किचन', 'दुधावरची साय', 'चॉईस ईज युवर्स', 'यू टर्न', 'हिमालयाची सावली' अशा प्रसिद्ध नाटकांची त्यांनी निर्मिती केली होती.

गोविंद चव्हाण हे बोरिवली येथे राहणारे होते. काल दुपारी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल सायंकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  मात्र आच सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने आज सकाळी त्यांचं निधन झालं.

नाट्य विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली आहे. तर काहींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

 

Recommended

Loading...
Share