या मालिकेच्याही चित्रीकरणाचा झाला श्रीगणेशा, अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

By  
on  

 

शासनाच्या नियमांचे पालन करत बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तब्बल चार  महिन्यांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने कलाकार प्रचंड आनंदी झाले आहेत.

'हे मन बावन' या मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळचा फोटो अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. 

ती या पोस्टमध्ये लिहीते की, "अखेर शुटिंग सुरू झालं.. तब्बल ४ महिन्या नंतर.. तुमच्या आशीर्वादामुळे इथवर पोहोचलो.. या पुढेही अशीच साथ द्यावी हि नम्र विनंती.."

लॉकडाउनच्या काळात टेलिव्हीजनवर मालिकांचे जुने भाग पाहायला मिळत होते. मात्र आता जवळपास बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. काही वाहिन्यांवर तर नवे भाग प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता 'हे मन बावन' या मालिकेचेही नवे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

य़ा मालिकेत शर्मिष्ठा ही शशांक केतकरच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. संयोगीता असं तिच्या भूमिकेचं नाव आहे.

Recommended

Loading...
Share