अभिनेत्री लीला चिटणीस यांच्या स्मृतीदिनी सचिन पिळगावकर यांनी शेयर केली ही आठवण

By  
on  

प्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्या काळात त्यांना विविध दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. ब्लॅक एन्ड व्हाईट सिनेमात ते आत्तापर्यंत त्यांनी विविध कलाकारांसोबत काम केलय. अशीच एक जुनी आठवण सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर शेयर केली आहे.

 

अभिनेत्री लीला चिटणीस यांच्या 17 व्या  स्मृतीदिनी त्यांनी त्यांच्यासोबतची आठवण शेयर केली आहे. सचिन यांनी लीला यांच्यासोबत मंझली दीदी सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहीलय की, "लीला चिटणीस यांचा आज 17 वा स्मृतीदिन आहे. मंझली दीदीमध्ये मी त्यांच्या मुलाची भूमिका केली होती. त्या भारतातील पहिल्या लक्स ब्युटी सोप मॉडेल होत्या."

Recommended

Loading...
Share