पत्नी आणि मुलीसोबत पुष्करने असा साजरा केला वाढदिवस

By  
on  

अभिनेता पुष्कर जोगचा आज वाढदिवस असल्याने सोशल मिडीयावर त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या लॉकडाउनच्या परिस्थितीत कुठेही न जाता पुष्करने घरातच कुटुंबासोबत त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.

पुष्करची पत्नी जास्मिन आणि मुलगी फेलीशासोबत त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. नुकतच पुष्करची पत्नी जास्मिनने त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत पुष्कर केक कापताना दिसतोय. शिवाय मुलगी फेलीशाही सोबत केक कापतेय. केक कापतानाची ही मस्ती कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

 

कलाविश्वातील मित्रपरिवारानेही पुष्करला सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share