By  
on  

हा मान मिळाल्याचं भाग्याचं समजतो अभिनेता सिध्दार्थ जाधव, शाहीर विठ्ठल उमप यांना केलं विनम्र अभिवादन

 नुकतच शाहीर विठ्ठल उमप यांच्या 89 व्या जयंती निमित्ताने अभिनेता  सिध्दार्थ जाधवने सोशल मिडीयावर पोस्ट करून त्यांना अभिवादन केलं आहे. एक प्रतिभावंत कलाकार, शाहीर , गीतकार म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल उमप यांची कारकिर्द मोठी आहे. आणि याच शाहीरांना मानाचा मुजरा करत सिध्दार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शाहीत विठ्ठल उमप यांचे फोटो पोस्ट करून सिध्दार्थ लिहीतो की, " कोळीगीते, तुकोबाचे अभंग, जांभुळाख्यानासारखी दुर्लक्षीत लोककथा, संपूर्ण लोक कला साहित्य सराईतपणे हाताळत ‘बाबा’ आपल्या काळजाचा ठाव घ्यायचे...प्रतिभावंत लोककलावंत, अभिनेते, गीतकार शाहीर 'विठ्ठल उमप' यांच्या ८९ व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! "बाबा" तुमच्या नावानं सुरु झालेल्या " लोक शाहीर विठ्ठल उमप पुरस्काराचा" पहिला मानकरी होण्याचा मान मला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

भीम गौरव गीते, कोळीगीते, तुकोबाचे अभंग, जांभुळाख्यानासारखी दुर्लक्षीत लोककथा, संपूर्ण लोक कला साहित्य सराईतपणे हाताळत ‘बाबा’ आपल्या काळजाचा ठाव घ्यायचे... प्रतिभावंत लोककलावंत, अभिनेते, गीतकार शाहीर 'विठ्ठल उमप' यांच्या ८९ व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! "बाबा" तुमच्या नावानं सुरु झालेल्या " लोक शाहीर विठ्ठल उमप पुरस्काराचा" पहिला मानकरी होण्याचा मान मला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो.

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) on

 

लोक शाहीर विठ्ठल उमप पुरस्काराचा पहिला मानकरी ठरल्याचा मान मिळाल्याची आठवणही त्याने यात शेयर केली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive