या अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर आहे चक्क 1.8 मिलीयन फॉलोअर्स

By  
on  

'फुलपाखरू' फेम ऋता दुर्गुळेचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत. नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे 1.8 मिलीयन फॉलोअर्स झाले आहेत. सोशल मिडीयावर ऋताचा प्रचंड मोठा चाहतावर्ग देखील आहे. नुकतच तिने सोशल मिडीयावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांचे यासाठी आभार मानले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank You For 1.8M Love ️ #gratitudealways #positivevibesonly #latepost

A post shared by Hruta (@hruta12) on

 

''फुलपाखरू' या मालिकेतून ऋता दुर्गुळे जास्त लोकप्रिय झाली. याआधीही काही मालिकांमध्ये ऋता झळकली होती. मात्र फुलपाखरुमधील वैदेही लोकांच्या पसंतीस उतरली. 

आगामी काळात अनन्या या सिनेमात ही ऋता मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमातील तिची भूमिका आव्हानात्मक असल्याने ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Recommended

Loading...
Share