ही आहे 'मोगरा' मधील राधिका, स्पृहा जोशीने फोटो केले पोस्ट

By  
on  

सध्या लॉकडाउनच्या काळात ओटीटीसह इतर ऑनलाईन मरोरंजनाचे प्लॅटफॉर्म खुले झाले आहेत. यातच विविध ऑनलाईन कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. सिनेमागृहांची जागा ओटीटीने मोठ्या प्रमाणात घेतली तर नाट्यगृहांच्या ऐवजी आता नाटक ऑनलाईन पाहता येत आहेत. 

यातच नेटक ही संकल्पना घेऊन ह्रषिकेश जोशी यांचं 'मोगरा' हे नाटक नाट्यरसिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध झालं आहे. तेव्हा प्रेक्षक हे नाटक घरबसल्या पाहत आहेत. ह्रषिकेश जोशी दिग्दर्शित या नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी, वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले हे कलाकार नाटकात मुख्य भूमिकेत आहेत. शुभारंभाच्या प्रयोगानंतर या नाटकाचे आणखी प्रयोग होत आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशी या नाटकात राधिकाच्या भूमिकेत आहे. याच निमित्ताने स्पृहाने काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

Recommended

Loading...
Share