शेवंताने पोस्ट केला हा घायाळ करणारा फोटो, फोटोसोबत अपूर्वाने लिहीलं हे कॅप्शन

By  
on  

सोशल मिडीयावर मराठी अभिनेत्रींपैकी एक अशी अभिनेत्री आहे जिच्या अदांवर चाहते फिदा आहेत. तिचा फोटो  आणि तिचे व्हिडीओ पोस्ट झाले की त्यावर लाईक्सचा वर्षाव चाहते करतात. शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविध फोटो ती पोस्ट करताना दिसते.

नुकताच अपूर्वाने तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. तिचं फोटोतील सौंदर्य पाहून चाहते फिदा झाले आहेत. मात्र या सुंदर फोटोसोबत जोडलेलं शायरी कॅप्शनही लक्ष वेधतय. ती या कॅप्शनमध्ये लिहीते की, "गुनाह तो बहोत किये है जिंदगी में, मगर सजा वहा मिली जहा बेकसूर थे हम." असं विचार करायला लावणारं कॅप्शन अपूर्वाने लिहीलं असलं तरी तिच्या फोटोकडेच लक्ष जातं अशी ही पोस्ट आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gunnah toh bohat kiye hain zindagi mein, Magar saza wahan mili jahan beqasoor the hum. . . #apurvanemlekar #imdwayiam

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

अपूर्वाने नुकतच स्वत:चं यूट्यूब चॅनल सुरु केलं आहे. जिथे अपूर्वा विविधं रुपात तिचे व्हिडीओ पोस्ट करते. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या अपूर्वाचे सोशल मिडीयावर असंख्य चाहते आहेत.

Recommended

Loading...
Share