By  
on  

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यानंतर हे मराठी कलाकारही जाणआर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. आणि आता त्यानंतर आणखी काही मराठी कलाकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेताना दिसत आहेत. प्रिया बेर्डेयांच्यासह 7 कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री माया जाधव, अभिनेत्री प्रेमा किरण, अभिनेते रामकृष्ण शिंदे या कलाकारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सांस्कृतिक विभागात हे कलाकार कार्यरत असतील.

मराठी चित्रपटसृष्टीत माया जाधव यांची जवळपास 40 वर्षांची कारकिर्द आहे. त्यांनी आत्तापर्यंत 70 हून अधीक सिनेमांमध्ये काम केलं आहे. लावणी नृत्यांगना म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी आपुलकी असल्याचं नुकतचं त्यांनी एका मुलाखतीत सांगीतलं.
तर प्रेमा किरण या टेलिव्हीजन विश्वातील मालिका कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive