'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेती आधीची शनाया परत आली आहे. सुरुवातील अभिनेत्री रसिका सुनील ही भूमिका साकारत होती. मात्र भारताबाहेर शिक्षणासाठी जायच्या कारणामुळे तिच्या जागी अभिनेत्री ईशा केसकरची रसिका म्हणून एन्ट्री झाली होती. मात्र पुन्हा मालिकेत आल्याने रसिका आनंदी आहे. मात्र तिला सध्या आई-वडिलांची प्रचंड आठवण येत आहे. सध्या चित्रीकरणासाठी घराबाहेर पडावं लागत असल्याने आई-वडिलांना सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होऊ लये यासाठी ती त्यांच्यापासून दूर राहतेय.
मात्र नुकतच तिने एक भावुक पोस्ट शेयर केली आहे. तिच्या आई-वडिलांसोबतचे फोटो पोस्ट करून लिहीलय की, “मला दोघांची आठवण येत आहे ! या स्टुपीड व्हायरसमुळे तुमच्या प्रियजनांना पाहता येत नाही. मला माहित आहे की आपल्या लाडक्या लोकांपासून दूर राहून त्यांची कशी काळजी घ्यायची ते. ही नेहमीच जाणीवपूर्वक निवड राहिली आहे. पण यावेळी हे लादलेलं होतं, की मी माझ्या सुट्टीतही तुम्हाला बघायला येऊ शकत नाही. हे खूप चिडचिड आणि दु:खी करणारं आहे. फक्त एकच मनाला पटणारी गोष्ट आहे की मी दूर राहून तुम्हाला सुरक्षित ठेवतेय. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये परत येणं ही जाणीवपूर्वक निवड होती, मला माहित होतं मी काय साईन करतेय ते. दररोज रात्री 8 वाजता मला हजारो ह्दय हसताना आणि आनंदी दिसतात, तुम्ही दोघही त्यात आहात आई बाबा. मला इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर मिळणारे मेसेज हे हद्यस्पर्शी आहेत. जेव्हा लोकं म्हणतात की “आज एपिसोड बघून खूप हसलो”, “माझी आई खूप आनंदी आहे तू परतल्यावर”. या वाईट काळात ही खूप चांगली बातमी आहे. तरी मी माझ्या पालकांना प्रचंड मिस करतेय, पण मला प्रत्येक दिवशी मिळणारं प्रेम आणि हास्य ही वस्तूस्थिती मी नाकारू शकत नाही. नेहमीच कृतज्ञ, धन्यवाद.”
ही पोस्ट करुन रसिकाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.