पाहा Video : प्रेक्षकांसाठी घरातच सजलेला कलाकारांचा सोहळा, 'नवी उमेद, नवी भरारी'

By  
on  

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संकल्पना समोर येत आहेत. यातच कलर्स मराठी वाहिनीवर अशाच वेगळ्या संकल्पनेतून निर्माण झालेला अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळणार आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमधील आणि मालिकेतील प्रसिद्ध कलाकार त्यांच्या कलेचं सादरीकरण घरातूनच करणार आहेत. 

या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे, गायक अवधुत गुप्ते, अभिनेता सचिन पिळगावकर, अभिनेता सुमीत राघवन, बाल गायक हर्षल नायबाळ, अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्यासह अनेक कलाकार असतील. या कलाकारांची गाणी, नृत्य असा संगीतमय कार्यक्रम असणार आहे.  'नवी उमेद, नवी भरारी' असं या कार्यक्रमाचं नाव आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपल्या भेटीची नवी उमेद देईल मनाला उभारी, मनोरंजनाच्या उंच आकाशी घेऊ नवी भरारी. घेऊन येतोय घरातल्या प्रेक्षकांसाठी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने घरातच सजलेला सोहळा लय भारी. पाहा 'नवी उमेद, नवी भरारी' रवि. 26 जुलै संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर. @avadhoot_gupte @maheshmkale @sachin.pilgaonkar @sumeetraghvan @chinoosumeet @spruhavarad @amol.bawdekar @ashok_phal_dessai @vidulachougule @harshadnaybalofficial

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

नुकतच वाहिनीने या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित केला असून येत्या  26 जुलै रोजी हा कार्यक्रम पाहता येणार आहे. यात लिहीलय की, "आपल्या भेटीची नवी उमेद देईल मनाला उभारी, मनोरंजनाच्या उंच आकाशी घेऊ नवी भरारी. घेऊन येतोय घरातल्या प्रेक्षकांसाठी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने घरातच सजलेला सोहळा लय भारी. पाहा 'नवी उमेद, नवी भरारी'"

Recommended

Loading...
Share