By  
on  

"कौतुक आणि टीका दोन्ही स्विकारा", म्हणतेय सैराटची आर्ची

लॉकडाउनच्या काळात सैराटची आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुदेखील तिच्या घरीच आहे. घरात बसून रिंकू विविध गोष्टी करत आहे. शिवाय सध्या सोशल मिडीयावरही ती मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली आहे. रिंकूने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. एवढच नाही तर या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरतय.

रिंकू या पोस्टमध्ये लिहीते की, "दोन्ही स्विकारा, कौतुक आणि टीका, फुलाला उलण्यासाठी सुर्य आणि पाऊस दोन्ही लागतं" शिवाय या पोस्टमध्ये रिंकूने पोस्ट केलेले फोटोही तिच्या चाहत्यांना आवडले आहेत. 

लॉकडाउनच्या काळात रिंकूची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री झाली होती. 'हंड्रेड' या वेबसिरीजमध्ये रिंकू झळकली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive