By  
on  

'समांतर 2'मधील ती बाई कोण ? स्वप्निल जोशीने चाहत्यांनाच विचारला हा प्रश्न..

'समांतर' या वेब सिरीजने लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. कोरोनाग्रस्त परिस्थिती लॉकडाउनच्या काळात ही वेब सिरीज प्रदर्शित झाली होती. आणि घरबसल्या प्रेक्षकांचं या वेब सिरीजने भरपुर मनोरंजन केलं. सुहास शिरवाळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित या वेबसिरीजमधील गुढकथा पाहणं रंजक ठरलं. अभिनेता स्वप्निल जोशी, तेजिस्विनी पंडित, नितीश भारद्वाज अशा मुख्य भूमिका असेलेले कलाकार आणि त्यांचा उत्तम अभिनय यात पाहायला मिळाला. मात्र पहिल्या भागानंतर या सिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पहिल्या भागातली कथा अजूनही अपूर्ण आहे, त्यामुळे पुढे काय ? या विचारात प्रेक्षक आहेत. शिवाय पहिल्या भागात एका बाईचाही उल्लेख करण्यात आला होता. आणि ती बाई कोण हे त्या भागात दाखवलं नव्हतं. हीच बाई आता समांतरच्या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यातच अभिनेता स्वप्निल जोशीने त्याच्या ट्विटरवर चाहत्यांना याविषयीच एक प्रश्न विचारला आहे. स्वप्निल या ट्विटमध्ये लिहीतो की, "समांतर2 मधील "ती बाई" !!! कुठल्या अभिनेत्रीला बघायला आवडेल !? Reply मध्ये तुमच्या मनातलं casting सांगा !"

 

स्वप्निलने स्वत:चं चाहत्यांना हा प्रश्न विचारून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय चाहत्यांनीही उत्साहात विविध अभिनेत्रींची नावे सुचवली आहेत. यात मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर यांच्यासह अनेक नावं चाहत्यांनी कमेंटमध्ये सांगीतली आहेत.

मात्र आता 'समांतर 2' मध्ये आता ती बाई कोण हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive