By  
on  

अभिनेत्री सई ताम्हणकरचा हा प्रिन्सेस स्नो व्हाइट लुक पाहिला का ? अशी दिसली सुंदर

शासनाच्या नियममांचं पालन करत नुकतीच मालिका विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचंही चित्रीकरण सध्या सुरु आहे. सेटवर पुन्हा परतल्याने आणि चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने कलाकार प्रचंड आनंदी आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर या कार्यक्रमाची परिक्षक आहे. या कार्यक्रमात सईचे विविध लुक्सही पाहायला मिळतात.

सई ताम्हणकरने नुकताच तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती लिहीते की, "जेव्हा मी कुणालातरी हे प्रिन्सेस स्नो व्हाइट बोलताना ऐकते."

सईने या लुकमध्ये पांढऱ्या रंगाच आउटफीट परिधान केलय. सईचा हा स्नो व्हाईट लुक सुंदर दिसतोय. मात्र या लुकमध्ये तिला प्रिन्सेस स्नो व्हाइट असं म्हटलं जातय असं काहीसं गमतीशीर कॅप्शन तिने या फोटोला दिलय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive