By  
on  

'खतरों के खिलाडी 10' च्या फिनालेसाठी अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लुक

 सुत्रसंंचालक, परिक्षक, स्पर्धक अशा विविध गोष्टी करु पाहणारी अभिनेत्री अमृता खानविलकर खतरों के खिलाडी च्या दहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसली. या शोमध्येही ती जिद्दीने जबरदस्त असे एकापेक्षा एक टास्क करताना दिसली. मात्र या शोमध्ये पुढे जाऊ शकली नाही. तरीही तिचा या शोमधील प्रवास मात्र लक्षवेधी ठरला

याच कार्यक्रमाचा फिनाले नुकताच पार पडलेला पाहायला मिळतोय. अमृताने या फिनालेचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. यावेळी अमृता काळ्या रंगाच्या सुंदर आउटफीटमध्ये सुंदर दिसली. शिवाय तिच्या इतर सह स्पर्धकांना आणि मित्रमंडळींनाही ती यावेळी भेटली असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील फोटोंमध्ये पाहायला मिळतय.

लॉकडाउनमध्ये घरातच असलेली अमृता बऱ्याच दिवसांनी शुटिंगच्या सेटवर गेल्याचं पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive