By  
on  

अमेय वाघकडून निपुण धर्माधिकारीला वाढदिवसाच्या मिळाल्या अशा शुभेच्छा

दिग्दर्शक, अभिनेता निपुण धर्माधिकारीचा आज वाढदिवस आहे. आणि याच वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निपुणचा जवळचा मित्र अभिनेता अमेय वाघनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एक हटके फोटो पोस्ट करून त्याच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "नेटफ्लिक्सवर निपुण धर्माधिकारीने डायरेक्ट केलेला मिसमॅच नावाचा शो येतोय लवकरच! पण तो आमचा बायोपीक नव्हे.... कारण आम्ही परफेक्ट मॅच आहोत ! गोय्रा गोय्रा हातात बियरचा ग्लास ...सगळा मास म्हणतो आमचे धनी टॉप क्लास ! हॅपी बर्थडे धनी !"

 

यात त्याने नेटफ्लिक्सवर येणाऱ्या निपुणने दिग्दर्शित केलेल्या मिसमॅचचाही उल्लेख केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Have your back always...any which way. @nipundharmadhikari Happy Birthday

A post shared by Sachin Khedekar (@sachinskhedekar) on

 

तर अभिनेता सचिन खेडेकर यांनीही निपुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. निपुणच्या 'बापजन्म' या सिनेमातही सचिन खेडेकर झळकले होते. त्यांनी निपुणसोबत मस्ती करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. 

तर सारंग साठ्येनेही निपुणचा फोटो पोस्ट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारंगने निपुणला खट्याळ म्हणत त्याचा अगदी जुना फोटो पोस्ट केला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive