By  
on  

अग्गंबाई ! सासूबाईंनी बनवला अस्सल बेळगावी पदार्थ 'कढी पत्रावडे'

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील आसावरी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ आसावरी म्हणून घराघरांत लोकप्रिय आहेत. एक आदर्श आई, एक आदर्श सासू  म्हणून  त्यांच्याकडे  पाहिलं जातं, लॉकडाऊनच्या तीन महिन्यानंतर  चॅनेल्सवर नवीन एपिसोड सुरु झाल्याने आता निवेदिता सराफ या रोजच चाहत्यांच्या भेटीला येतात. पण या शिवाय त्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या संपर्कात असतात 

प्रेक्षकांची लाडकी आसावरी मालिकेत सुगरण आहेच. पण ख-या आयुष्यातसुध्दा त्या साक्षात अन्नपूर्णा आहेत. आपल्या नवनवीन रेसिपी चाहत्यांपर्यंत पोहोचावी यासाठी  निवेदिता यांनी स्वत:चं युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे. या चॅनेलच्या माध्यमातून त्या विविध रेसिपीज चाहत्यांशी शेअर करत असतात. आज त्यांनी बेळगावची प्रसिध्द रेसिपी कढी पत्रावडे  करुन दाखवले, 

चाहत्यांनी या नव्या रेसिपीवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

निवेदिता सराफ यांनी तयार केलेले हे खमंग कढी पत्रावडे पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल यात शंका नाही. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive