लॉकडाउनचा वाढता काळ त्यात जरी हळूहळू अनलॉक होत असलं तरी काही जणं अजूनही घरातच आहेत आणि नियमांचे पालन करत आहेत. त्यातच अभिनेता आदिनाथ कोठारे आणि परिवार लॉकडाउन सुरु असल्यापासून घरातच आहेत. कोठारे विजनच्या मालिकांच्या चित्रीकरणासाठीही आदिनाथ आणि महेश कोठारे मात्र घराबाहेर पडले होते. मात्र या लॉकडाउनच्या काळात आदिनाथ, पत्नि उर्मिला कोठारे आणि जिजा एकत्र वेळ घालवत आहेत.
अभिनेता आदिनाथने नुकताच पत्नि उर्मिलासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये उलट कॅमेरा करून त्याने क्लिक केलेला हा सेल्फि पाहायला मिळतोय. शिवाय या पोस्टमध्ये त्याने लॉकडाउन इफेक्ट असं मजेशीर कॅप्शनही लिहीलय.
सोशल मिडीयावर त्याच्या चाहत्यांना या कपलचा हा हटके फोटो चांगलाच आवडला आहे. चाहत्यांनीही या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.