होम मिनिस्टर हा कार्यक्रम सध्या लॉकडाउनच्या काळात वेगळ्या रुपात पाहायला मिळतोय. होम मिनिस्टर आता 'होम मिनिस्टर घरच्याघरी' च्या रुपात पाहायला मिळतय. सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी घरातूनच दुसऱ्या घरात बसलेल्या पाहुण्यांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचं चित्रीकरण अद्याप बाहेर सुरु केलेलं नाही. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणारे पाहुणे स्वत:च्या घरात बसून व्हिडीओ कॉल द्वारे आदेश भावोजींशी गप्पा मारतात.
मात्र आता‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ च्या येणाऱ्या विशेष भागामध्ये मध्ये आदेश भावोजी हे कोरोना वॉरियर्स सोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत, हे ते वॉरीयर्स आहेत ज्यांनी स्वतःच्या घरची किंवा घरच्यांची काळजी न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी सतत झटत राहिले, त्यांचा सन्मान आणि त्यांना थोडासा आनंद देण्याचा झी मराठी आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाचा हा प्रयत्न आहे.
कोरोनाग्रस्त परिस्थितीत या वॉरियर्सनी जनतेची घेतलेली काळजी आणि यात त्यांच्या घरच्यांसोबत झालेला दुरावा या सगळ्या गोष्टी या खास भागांमधून प्रेक्षकांंसमोर उलगडणार आहेत.
‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ चे हे विशेष भागप येत्या 27 जुलै पासून झी मराठीवर पाहायला मिळतील.