By  
on  

ह्या मराठी अभिनेत्रीने चार वर्षानंतर चढवली खाकी वर्दी, जाणून घ्या सविस्तर

करोना संकटामुळे जवळपास तीन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याची परवानगी दिली. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. 

अनेक कलाकार आता सेटवर परतून आपल्या कामाचा श्रीगणेशा करत आहेत. त्यांचा आनंद सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. परीचंसुध्दा असंच झालंय. बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री म्हणजे परी तेलंग. परीने सिनेसृष्टीत आपली ओळख भूमिकांमधून निर्माण केली आहे. परीची लक्ष्य या इन्व्हेस्टिगेटिव्ह मालिकेतील महिला पोलिसाची भूमिकासुध्दा बरीच गाजली. आता ती तब्बल चार वर्षांनंत पुन्हा पोलिस इन्स्पेक्टर शिवानी पाटील म्हणून प्रेक्षकांसमोर येतेय. पण यावेळेस सावधान इंडीया या प्रसिध्द हिंदी मालिकेत. 

 

तडफदार पोलिस अधिकारी शिवानी पाटीलला पाहायला चाहते बरेच उत्सुक आहेत. परी तेलंगला या नव्या भूमिकेसाठी खुप खुप शुभेच्छा.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive